पालिकेतील ड्रेनेज कामगारांचे गुरुवारपासून आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेतील ड्रेनेज कामगारांचे गुरुवारपासून आंदोलन

Share This
मुंबई : पालिकेतर्फे दिल्या जाणार्‍या सुविधा आणि लाभापासून वंचित ठेवल्यामुळे ड्रेनेज कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषास वाट देण्यासाठी येत्या (३० एप्रिल) गुरुवारपासून प्रत्येक वॉर्डमधील ड्रेनेज कामगार आंदोलनास उतरणार आहे. परळ एफ/दक्षिण येथील पालिकेच्या कार्यालयापासून आंदोलन सुरू होणार आहे. 


राज्य सरकारने पालिकेतील सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्याची घोषणा नुकतीच अधिवेशनात केली होती. मात्र यापैकी १४ हजार ड्रेनेज कामगारांना वगळून इतर २८ हजार कामगारांना घरे देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे मालकी हक्काच्या घरांनाही ड्रेनेज कामगारांना मुकावे लागणार आहे. पालिकेच्या धोरणामुळे इतर सफाई कामगारांना मिळणार्‍या सुविधांपासून ड्रेनेज कामगारांना मुकावे लागत असल्याची माहिती ड्रेनेज कामगार संघर्ष समितीचे संयोजक सीताराम लव्हांडे आणि महेंद्र जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली. ड्रेनेज कामगारांच्या लढय़ात आ. कालिदास कोळंबकर, आ. कपिल पाटील, अखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदभाई परमार सहभागी होणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages