नालेसफाई कामांचे २४५ कोटीचे प्रस्ताव मंजूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाई कामांचे २४५ कोटीचे प्रस्ताव मंजूर

Share This
मुंबई १५ एप्रिल (प्रतिनिधी): मुंबईतील शहर, पश्चिम व पूर्व उपनगरातील लहान-मोठे नाल्यांची सफाई करण्याचा २४५ कोटीं रुपयांच्या कंत्राटाला सत्ताधारी आणि विरोधक यांनी कोणतीही चर्चा न करता स्थायी समितीत मंजुरी दिली. 



मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामे केली जाते. त्यासाठी दरवर्षी कोट्यवाधी रुपयांचे कंत्राट कंत्रटदारांना दिले जाते. मुंबई मध्ये दर वर्षी नाले सफाई झाली तरीही पाणी तुंबण्याच्या घटना होत असतात याबाबत कोणतीही चर्चा न करता नालेसफाईच्या कंत्राट कामाचा २४५. ९० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. या कंत्राटमध्ये मिठी नधीतील गाळ उपसण्याचे कामही समाविष्ट आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages