मुंबई १५ एप्रिल (प्रतिनिधी): मुंबई दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासात भर पडली आहे. या संदर्भात वाढत्या फेरीवाल्यांवर पालिका प्रशासन कारवाई करणार नाही, असा सवाल मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीत केला.
पालिका प्रशासनाने फेरीवाला क्षेत्र आणि न फेरीवाला क्षेत्र अशी यादी करून वेंडिंग कमिटीकडे पाटविली आहे. याला तीन महिने होऊनसुद्धा अद्याप काहीही कारवाही केलेली नाही. यानुसार फेरीवाला झोनची अंमलबजावणी कधी होणार तसेच न फेरीवाल झोनमध्ये बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यसाठी प्रशासनाने काय तयारी केली आहे, याची माहिती देण्यात यावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली.
यावर बोलताना भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले की, फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्याने सर्वच्च न्यायाल्याने गाईड लाईन बनविण्याच्या सूचना केल्याचे सांगत मात्र प्रशासनाने आज्पार्य्नात फेरीवाल्यांची यादी तयार केलेली नाही. याचा अर्थ सर्वच्च न्यायाल्याचा हा अवमान असण्याचा आरोप कोटक यांनी केला. प्रशासनाने प्रथम फेरीवाला यादी तयार करावी आणि नंतर फेरीवाला झोने तयार करावे अशी सूचना त्यांनी केली.
सहाय्यक आयुक्तांना निलंबित करा
दादर पश्चिमकडून पुलाखाली जागेची पाहणी आयुक्त सीताराम कुंटे यांनी केल्यानंतर येथील जागा मोकळी करण्यात आली होती. मात्र या मोकळ्या जागेब्वर जी- उत्तर विभागाच्या सहय्यक आयुक्तांच्या आशीर्वादाने अनधिकृत फेरीवाले बसवण्यात आले आहेत. यामुळे दादर पास्चीम्कडे येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आयुक्तांच्या आदेशाने पुलाखाली जागा फेरीवाला मुक्त असणे आवश्यक असतानाही ज्या सहा. स्युक्तांच्या आशीर्वादाने अनधिकृत फेरीवाल्यांना संरक्षण दिले जात आहे. त्यान्ह्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, सही मागणी सुधीर जाधव यांनी केली.