कस्तूरबा रुग्णालयात प्रशासनाचा अनागोंदी कारभार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कस्तूरबा रुग्णालयात प्रशासनाचा अनागोंदी कारभार

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगरपालिकेच्या कस्तूरबा रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरु असून दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी दखल घेवुन कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या दिलीप नाइक यांनी केली आहे. 

मुंबई महानगर पालिकेच्या कस्तूरबा रुग्णालयातील वार्ड क्रमांक १४ गेले ४ वर्षे बंद आहे. या वार्डच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयापेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे. यावेळी वार्ड १४ मधील रुग्णाना वार्ड क्रमांक २६ येथे हलवण्यात आले होते. करोडो रुपये खर्च करूनही हा वार्ड बंद ठेवण्यात आला आहे. वार्डमध्ये असलेले सोनोग्राफी मशीन सध्या वापरात नसल्याने बंद अवस्थेत आहे. यामुळे रुग्नाना सोनोग्राफी साठी जवळच्या रुग्णालयात किंवा खाजगी केंद्रात जावे लागते. या वार्डमध्ये सध्या घुशी आणि उंदरांचा उपद्रव वाढला आहे. 

रुग्णालयातील वार्डच्या दुरुस्तीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा शवागार मोड़कळीस आले आहे. शवागारातील 
वातानुकुलीत प्लांट ६ महीन्यापूर्वी नवीन बसवण्यात आला आहे. या प्लांटकड़े शवागाराकडून जावे 
लागत असल्याने कर्मचार्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. कस्तूरबा रुग्णालयातील भ्रष्टाचारात
सहभागी न झालेल्या दुय्यम अभियंता विशाल मोहिते यांनी राजीनामा दिला होता. या सर्व प्रकरणाची गंभीर 
दखल घेत पालिका आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या 


दिलीप नाइक यांनी आयुक्तांकड़े केली आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages