मुंबई (पतिनिधी) - महानगरपालिका क्रीडाभवनाच्या गैरकारभारा प्रकरणी चौकशी अहवाल बनवण्यास प्रशासन वेळकाढू धोरण अवलंबत आहे. त्यामुळे खेळाडू आणि सभासद यांच्यावर होणारा अन्याय ताबडतोब दूर करावा अन्यथा मी स्वतः खेळाडू व सभासद यांना बरोबर घेऊन उपोषण सुरू करेल असा इशारा माजी महापौर, नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे याना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे .
पालिका क्रीडाभवनाच्या गैरप्रकाराबाबत श्रद्धा जाधव यांनी आयुक्तांबरोबर दोन वेळा पत्रव्यवहार केला आहे. तसेच याबाबत चर्चाही केली आहे. तरीही अद्याप खेळाडू व सभासदांना अद्याप न्याय मिळाला नाही. या प्रकाराबाबत महापौर दालनात 23 नोव्हेंबर 2014 रोजी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत क्रीडाभवनाची जबाबदारी सोपविलेले सहआयुक्त एस. एस . शिंदे यांनी याबाबत कानाडोळा करून आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न केले. शिंदे यांनी स्वतः काही करायचे नाही व दुसर्या सुद्धा काही करू दयावयाचे नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. क्रीडाभवनाच्या गैरप्रकाराबाबत विभागीय चौकशी 31 डिसेंबर 2014 पर्यंत पूर्ण होईल असे शिंदे यांनी महापौर दालनात 23 नोव्हेंबर 2014 रोजीच्या बैठकीमध्ये सांगितले होते. हा अहवाल अद्याप शिंदे यांनी सादर केलेला नाही. चौकशी मध्ये वेळकाढूपणा चाललेला आहे. चौकशी मध्ये कोण दोषी आहेत कोणावर कारवाई होणार आहे हे आरोपी व चौकशी करणारे अधिकारी किरण आचरेकर यांना याची कल्पना असल्यामुळे वेळकाढूपणा करण्यात येत आहे असे श्रद्धा जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. आयुक्तांनी ताबडतोब निर्णय घेवून खेळाडू व सभासद यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा अन्यथा खेळाडू व सभासदांना बरोबर घेऊन आयुक्त कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करू असा इशारा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना दिला आहे.