चित्रीकरणातून मध्य रेल्वेला १ कोटी २३ लाखां पेक्षा जास्त कमाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चित्रीकरणातून मध्य रेल्वेला १ कोटी २३ लाखां पेक्षा जास्त कमाई

Share This
मुंबई : चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि लघुपटांच्या चित्रीकरणातून गेल्या वर्षात मध्य रेल्वेने एक कोटी २३ लाखांपेक्षा जास्त कमाई केली आहे. भविष्यात माझगाव डॉक, वाडीबंदर स्थानके 'उभारून' ती 'शूटिंग लोकेशन' वापरण्यात येतील आणि चित्रीकरणासाठी लवकर परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजनाही सुरू करण्यात येईल, चित्रीकरणाच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला अधिकाधिक महसूल मिळवून देणारी मध्य रेल्वे देशातील प्रथम क्रमांकाची सेवा ठरली आहे अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दिली. 

चित्रीकरणासाठी सीएसटी स्थानक हे सर्वात जास्त असे आवडते असून, त्याखालोखाल लोणावळा, खंडाळा, इगतपुरी, नाशिक रोड, देवळाली ही स्थानके लोकप्रिय झाली आहेत. २0१४-२0१५ मध्ये 'बीबीसी' या जगप्रसिद्ध वाहिनीने रेल्वेबद्दल 'मुंबई रेल्वे' हा माहितीपट तयार केला, त्यासाठी मुंबईत व अन्यत्र चित्रीकरणही केले. यामुळे रेल्वेच्या गंगाजळीत तब्बल ६२ लाख ८३ हजार ८१८ रुपयांची भर पडली आहे. 'मुंबई रेल्वे' हा माहितीपट तयार करताना बीबीसीने १ ते १८ फेब्रुवारी २0१५ पर्यंत सीएसटी, वाडीबंदर, वडाळा येथे सलग चित्रीकरण केल्याने २६ लाख ९0 हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. 'सीआयडी' या लोकप्रिय मालिकेचेही आपटा स्थानकात १२ व १३ ऑगस्ट २0१४ रोजी चित्रीकरण झाल्यामुळे नऊ लाख ७५ हजार १३0 रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती पाटील यांनी दिली. मध्य रेल्वेत चित्रीकरणासाठी केवळ मुंबईतील संस्था उत्सुक नसून, चेन्नईतील प्रसिद्ध 'मद्रास टॉकीज'च्या 'ओके कनमणी'चेही ३0 नोव्हेंबर १४ रोजी चित्रीकरण झाल्याने मध्य रेल्वेला सात लाख ७६ हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याचे पाटील म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages