मुंबई : २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावा लागलेल्या महाराष्ट्राचे माजी एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूची नव्याने चौकशी करा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. बिहारचे माजी आमदार राधाकांत यादव आणि ज्योती बडेकर यांनी सेवानवृत्त आयपीएस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाच्या आधारे दाखल केलेल्या या याचिकेवर उन्हाळी सुट्टीनंतर सुनावणी होणार आहे.
करकरेंच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापण्याचीही विनंती याचिकेत करण्यात आली आहे. २00८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीदरम्यान नाव पुढे आलेल्या 'अभिनव भारत' संघटनेने करकरेंना लक्ष्य केले होते, असा आरोप याचिकेत केला आहे. करकरेंनी अनेक प्रकरणांचा उलगडा केला होता तसेच ते काही लोकांना अटक करणार होते. गुप्तचर यंत्रणेला (आयबी) २६/११ची कल्पना होती. 'अभिनव भारत'ने आयबीच्या संगनमताने करकरेंना मारण्यासाठी कामा हॉस्पिटलमध्ये समांतर ऑपरेशन सुरू ठेवले होते. करकरेंना जाणूनबुजून कामा हॉस्पिटलच्या आवारात पाठवले गेले होते, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे