मुंबई, दि. 15 : 176 ,वांद्रे (पूर्व)विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत या 19,008 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा पराभव केला.
शिवसेनेचे आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदार संघासाठी 11 एप्रिल रोजी मतदान झाले होते. या मतदार संघात एकूण 39% मतदान झाले होते. शिवसेना, काँग्रेस, ए.आय.एम.आय.एम. या प्रमुख पक्षांसह 7 अपक्ष असे एकूण 10 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 52,711 मते मिळाली आहेत. तर नारायण राणे यांना 33,703 मते मिळाली आहेत. ए.आय.एम.आय.एम चे रेह्बार सिराज खान यांना 15,050 मते मिळाली आहेत. अन्य उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे : प्रकाश ज्ञानेश्वर गंगावणे 92,शेख अब्दुल रहीम (मोटारवाला) 92,अरोरा सुरिंदर मोहन 74, डॉ. जगताप तुषार एकनाथ 231, दिनेश शेलार 73, दिलीप प्रभाकर अलोणी (जोशी काका) 103, शंकर सोनावणे 113, नोटा 819.