जगभरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वि जयंती जगभरात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. मात्र मुंबई मध्ये जयंती साजरी केली जात असताना भांडूप व घाटकोपर रमाबाई नगर येथील दोघांचा दोन विविध घटनांमध्ये मृत्यू झाला आहे.
भांडुपच्या मिलिंद तरुण मंडळाची मिरवणूक शीव उड्डाणपुलावर आली असता भरधाव डंपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात मंडळाचा कार्यकर्ता आदित्य वलेकर या १२ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर गजानन दाभाडे हा तरुण जखमी झाला. तर घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील डी. बी. पवार चौकात जयंती उत्सवासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री बुद्धवंदना सुरू असताना आकाशचा इलेक्ट्रिकच्या वायरला स्पर्श झाला. त्यावेळी शॉक लागून आकाश गुरव याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विद्युत रोषणाई करणार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंतनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
