कामगारांचे अभिलेख संगणकीय स्वरुपात संकलित करण्यास मान्यता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कामगारांचे अभिलेख संगणकीय स्वरुपात संकलित करण्यास मान्यता

Share This
मुंबई: दि. 15 : राज्यातील नोंदणीकृत कारखान्यांच्या कामगारांचे अभिलेख कागदपत्रांच्या स्वरुपाबरोबरच संगणकीय स्वरूपामध्ये संकलीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 

कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या रजा, प्रौढ कामगार हजेरी पत्रक, अतिकालीक कामाची स्लीप याबाबतचे अभिलेख तसेच निरीक्षकांना भेटीच्यावेळी किंवा इतर वेळी मागणी करून त्यांची तपासणी करण्याचे अधिकार निरीक्षकांना आहेत. ही सर्व माहिती जतन करण्यासाठी तसेच कारखान्यातील कार्यभार अधिक सोयीचा होण्यासाठी अभिलेख संगणकीय स्वरुपामध्ये संकलीत व जतन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

या निर्णयाचे काटेकोर  पालन करण्यासाठी कारखाना आस्थापना व्यवस्थापन यांना भेटीच्या वेळी किंवा अन्य कोणत्याही वेळी मागणी केल्यास  निरीक्षकांना तसेच कामगारांना अशा अभिलेखाची छापील प्रत उपलब्ध करून देण्यात येईल. या अटींच्या अधीन राहून अशा आस्थापनांना अशा प्रकारचे अभिलेख संगणकीय स्वरूपामध्ये संकलित व जतन करण्यास परवानगी देण्यात येत असून याबबतची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर  उपलब्ध करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages