मानखुर्द मध्ये लाखो लिटर पाणी वाया जात आहे. - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मानखुर्द मध्ये लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

Share This
मुंबई / रशिद इनामदार / JPN NEWS ( web news )
महाराष्ट्रातील बरयाच भागात दुष्काळासदृश्य परिस्थिती आहे .  उन्हाच्या झळा सोसत पाण्यासाठी वन वन भटकावे लागत आहे . बहुतेकांवर पाणी दे मिरिग दे  करायची वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नदी, नाले आटू लागल्यामुळे पाणीप्रश्न आणखी बिकट होत असतो. मानखुर्द मध्ये मात्र पाणीच पाणी चोहीकडे …. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . 

मागील काही दिवसांपासून मोहिते पाटील नगर आणि परिसरामध्ये २४ तास पाणी वाहताना दिसत आहे . पाण्याची बचत करण्याऐवजी स्थानिकांनी नळांना तोट्या न लावल्यामुळे पाणी भरून झाल्यावर नळ बंद करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीप्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक नगरसेविका सुनंदा विठ्ठल लोकरे तसेच बृहन्मुंबई महानगर पालिका एम पूर्व चे प्रभाग अधिकारी  किरण दिघावकर यांनी पुढाकार घेतला होता . परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीची ६०० मी मी क्षमता होती . ती अपुरी पडत आहे हे लक्षात आल्यावर वाढवून ती ९०० मी मी करण्यात आली. त्यानंतर मुबलक प्रमाणावर पाणीपुरवठा होऊ लागला . पाणी समस्या सुटल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. नागरिकांनी नळांना तोट्या लावणे आवश्यक असताना देखील त्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे पाणी भरून झाल्यानंतर नळ सुरूच राहतो व पाणी वाया जात असते. 


ग्यास आणि पेट्रोलियम च्या वाहिन्यांमुळे जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे अवघड झाले होते .स्थानिकांची पाणीसमस्या लक्षात घेता आम्ही नवीन ९०० मी मी ची नवीन जलवाहिनी जोडली आहे . जुन्या जलवाहिनीची दुरुस्तीचे काम ही सुरु आहे . पाणी गळती  तपासण्यासाठी जुन्या जलवाहिनीला पाणी सोडण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी वाया जात असेल .लगेच संबंधित खात्याला सांगून पाणी वाया जाऊ नये याची उपाययोजना करत आहोत . 
किरण दिघावकर, प्रभाग अधिकारी, महानगर पालिका मुंबई एम पूर्व 

नगरसेविका सौ सुनंदा विठ्ठल लोकरे यांनी स्थानिकांची पाणीसमस्या लक्षात घेता समस्येचा पाठपुरावा करून नवीन जलवाहिनी जोडणीचे काम केले. पाणीसमस्या सोडवल्यानंतर नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत आहे . नगरसेविका आणि प्रशानासनाने केलेल्या या कामात नागरिकांचे सहकार्य ही अपेक्षित आहे.पाणीपुरवठा सुरळीत झाला असताना नागरिकानी पाणी वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. 
विठ्ठल लोकरे , माजी नगरसेवक  



Post Bottom Ad

JPN NEWS

Pages