मौनी नगरसेवकांना समित्या पावल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मौनी नगरसेवकांना समित्या पावल्या

Share This
मुंबई, सोमवार (प्रतिनिधी)- महापालिकेतील विशेष समित्यांच्या अध्यक्ष पदाच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणूकींमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या पक्षांने इच्छूक नगरसेवकांचे पत्ते कापले असून जे मौनी नगरसेवक आहेत त्यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाचे ताईत बांधणार आहेत. त्यामुळे मौनी नगरसेवकांना समित्या पावणार असल्याचे चर्चा पालिकेत रंगली आहे.

महापालिकेतील विशेष समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूका शुक्रवारी (16 एप्रिल) होणार आहेत. त्यामुळे पालिकेत निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर सतत तीन वर्ष आरोग्य समिती अध्यक्षपदावर निवडून येणाऱ्या अभासेच्या गिता गवळी यांच्याकडून हे पद सध्या भाजपाच्या पारड्यात टाकले आहे. सुनिता यादव यांना आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. पालिकेतील सत्ताधारी असल्यामुळे संख्याबळामुळे त्या विजय होणार आहेत. तर स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदासाठी सेनेच्या संपत ठाकूर यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या अनिता यादव यांनी अर्ज केला आहे. स्थापत्य समिती उपनगरे करीता सेनेचे दिपक भाटकर यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी कॉग्रेसच्या उषा कांबळे निवडणूक लढविणार आहेत.

तर बाजार व उद्यान समिती सेनेने भाजपाकडून काढून घेतली आहे. या समितीच्या अध्यक्षपदासाठी सेनेचे अमित भंडारी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या सुषमा रॉय निवडणूक लढविणार आहेत. विधी समितीकरिता भाजपाचे कृष्णा पारकर तर महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पदाकरिता संजना मुगनेकर यांना संधी दिली आहे. यांच्या विरोधात अनुक्रमे कॉंग्रेसचे मनोज जामसूतकर आणि विनिता वोरा यांनी अर्ज केला आहे.

डॉ. शुभा राऊळ , शितल म्हात्रे, यामिनी जाधव आणि बागलकर यांना डावलले माजी महापौर शुभा राऊळ, शितल म्हात्रे, यामिनी जाधव आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष सुरेंद्र बागलकर यांना डावलण्यात आले आहे. हे सर्व नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याचे काम केले आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून प्रशासनाची पाठराखण करण्यासाठी मौनी नगरसेवकांना संधी दिल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. यामुळे नाराजीचे बाण सुटण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages