बेस्ट बसखाली स्कूटरचालक तरुणीचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट बसखाली स्कूटरचालक तरुणीचा मृत्यू

Share This
मुंबई : रस्त्यावरील दगडावरून स्कूटर घसरून दुभाजकाला धडकल्यानंतर बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन स्कूटरचालक तरुणी ठार झाल्याची दुर्घटना मालाड (प.) येथे रविवारी रात्री घडली. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी बेस्ट बसचालकाला निष्काळजीपणे बस चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे.


मालाड रेल्वे स्थानकाहून मढ जेट्टीकडे धावणारी रूट क्रमांक २७१ ची बेस्ट बस मीठ चौकी येथे रविवारी रात्री ९.२0 वाजेच्या दरम्यान आली. त्या वेळेस स्कूटरचालक मेरी थॉमस (२५) ही मीठ चौकी येथून स्कूटरवरून जात असताना स्कूटरच्या चाकाखाली दगड येऊन मेरीची स्कूटर रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने मेरी रस्त्यावर कोसळली. आणि त्याच वेळी मढ जेट्टीकडे भरधाव जाणार्‍या बसच्या उजव्या चाकाखाली येऊन मेरी थॉमस गंभीर जखमी झाली. बसचालक शरद मुळे (३२) याने पुढे बस थांबवली, मात्र १५ फूट मागे रस्त्यावर पडलेल्या मेरी थॉमसला गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला उपचारासाठी कांदिवलीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात हलवले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages