मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगर पालिकेच्या वैधानिक समितीच्या निवडणुका दरवर्षी एप्रिल महिन्यात होत असतात. त्याप्रमाणे वैधानिक समिती तसेच प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीच्या या वेळापत्रका प्रमाणे ६ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान या निवडणुका होणार आहेत. वैधानिक समित्या आणि प्रभाग समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने अनेक नगरसेवक नगरसेविकांनी आपली या पदावर वर्णी लागावी म्हणून जोरदार फिल्डिंग लावली आहे.
मुंबई महानगर पालिकेतील महत्वाच्या अश्या शिक्षण आणि र-थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक ६ एप्रिल रोजी होत आहे. सुधार आणि बेर-ट समिती अध्यक्ष पदाची निवडणूक ८ एप्रिल रोजी होत आहे तर र-थापत्य शहर, र-थापत्य उपनगरे, सार्वजनिक आरोग्य, बाजार व उद्यान, विधी, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडनूका 16 आणि 17 एप्रिल रोजी होत आहेत त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 13 एप्रिल पर्यंत आहे.
तर प्रभाग समिती अध्यक्ष पदाची निवडणूक प्रभाग सी व डी, ए, बी व ईतर, एफ/दक्षिण व एफ/उत्तर, जी/दक्षिण, पी/दक्षिण, पी /उत्तर, आर/दक्षिण, आर/उत्तर व मध्य, प्रभागाच्या निवडणूक 20 एप्रिल रोजी होत असून अर्ज भरण्याची तारिख 16 एप्रिल आहे. जी/उत्तर, एच/ पूर्व व पश्चिम, के /पूवॅ, के / पश्चिम, एल, एम / पश्चिम, एन , एस आणि टी पभागाच्या निवड 21 एप्रिल रोजी असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 आहे. एम / पश्चिम ,प भागाच्या निवडणुका 22 एप्रिल रोजी होत असून अर्ज भरण्याची मुदत 18 एप्रिल आहे .
