मुंबई : दोन अल्पवयीन मुले होंडा अँक्टिवा चालवत असताना त्यांनी एका महिलेला ठोकर मारल्यानंतर ते खाली कोसळले. त्या वेळी भरधाव आलेल्या बेस्ट बसने दोघांना चिरडले. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोघा मुलांना मृत घोषित केले असून महिलेवर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अँक्टिवा होंडा घेऊन घराबाहेर पडलेली गोवंडी परिसरात राहणारी आशिक शेख (१६) आणि आमिर खान (१७) ही दोन मुले गोवंडी ९0 फिट रोड येथे आली असता त्यांच्या स्कूटीने एका महिलेला ठोकर मारली आणि त्यांचा स्कूटीवरून ताबा सुटून ते खाली कोसळले. त्या वेळी शिवाजीनगर डेपोची ४८८ क्रमांकाची बेस्ट बस शाहू नगर बेस्ट डेपोला जात होती. या बेस्ट बसचा चालक संतोष वसंत व्यवहारे (३९) याच्या ताब्यातील बेस्टच्या डाव्या चाकाखाली आशिक शेख व आमिर खान हे दोघे आल्याने चिरडले गेले. या अपघाताची माहिती परिसरात पसरताच जमावाने बेस्ट बसची तोडफोड केली. संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व तत्काळ जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात हलविले. आशिक शेखला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केले, तर आमिर खान याचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या महिलेलादेखील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी बेस्ट बस चालकाला अटक केली आहे.