मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर प्लिकेच्या एम् पूर्व प्रभाग समितीच्या अध्यक्षपदा करीता बुधवारी झालेल्या निवड्णूकीमधे भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे उमेदवार अरुण कांबळे यांची निवड झाली आहे.
एम पूर्व येथील प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदासाठी भारीपचे अरुण कांबळे, शेतकरी कामगार पक्षाच्या खैरूनूसा अकबर हुसेन आणि समाजवादी पक्षाचे शांताराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. कांबळे याना शिवसेना भाजपाची 4, खैरूनुसा हुसेन याना अपक्ष व इतर नगरसेवकांची 4 तर शांताराम पाटील याना समाजवादी पक्षाची 4 मते मिळाली.
यावेळी शिवसेनेच्या मंजू कुंबरे यांनी अरुण कांबळे याना मत देत असल्याचे सांगत खैरूनुसा हुसेन यांच्या नावा समोर सही केली. यामुळे कुंबरे यांचे मत अवैध ठरवण्यात आले. तीनही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकुन अरुण कांबळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. या निवडणूकीवेळी पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर अलका केरकर यांनी कामकाज पाहीले.
दरम्यान या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या मंजू कुंबरे यांनी भारीपचे अरुण कांबळे यांचे नाव घेतले असले तरी शेकपच्या उमेद्वाराच्या नावा पुढे सही केली आहे. यामुळे मीच विजयी झाले होते परंतू पिठासन अधिकाऱ्यांनी माझ्यावर अन्याय करून अरूण कांबळे यांना विजयी घोषीत केले आहे. याबाबत लवकरच न्यायालयात जाणार असल्याचे शेकापच्या खैरूनुसा हुसेन यांनी पत्रकाराना सांगीतले आहे.
तर अपक्ष नगरसेवक मोहम्मद शिराज शेख यांचा शिवसेनेने पाठींबा घेताना 5 वर्षाच्या कार्यकालात 5 वर्षे स्थायी समिती आणि एक वर्ष प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्याचे मान्य करण्यात आले होते. परंतू शिवसेनेने आता पलटी मारली असून मला स्थायी समिती मधून काढण्यात आले आहे. प्रभाग समितीचे अध्यक्ष पदही दिलेले नाही. राहुल शेवाले यांनी दिलेले आश्वासन शिवसेनेकडून पाळले जात नाही. उद्धव ठाकरे यांचे पीए मिलींद नार्वेकर यांनी माझ्यावर अन्याय केल्याचे शेख यांनी सांगीतले.

