मुंबई : महापालिकेकडून आता सात दिवसांत बांधकाम परवाने मिळणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. व्यवसायात सुलभता आणण्यासाठी 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' ही प्रणाली महापालिकेत राबवण्यात येणार आहे.
बांधकामे परवानग्या मिळवण्यासाठी पालिकेकडून १४0 प्रकारचे विविध परवाने मिळवावे लागतात. त्यामुळे अनेक उद्योजक परवान्यांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी परवाने घेणेच बंद करतात. याचा विचार करून पालिकेने 'ईज ऑफ डुईंग बिझनेस' प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या किचकट परवाना प्रक्रियेमुळे मुंबईतील अनेक उद्योगांना खिळ बसली आहे. त्यासाठी अनेक परवानग्यांच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत आहे. नको असलेल्या परवानग्या कमी करून केवळ सात दिवसात बांधकाम परवाने देण्यात येणार आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली. या प्रस्तावावर बोलताना मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल , विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिकेतील अधिकार्यांची मानसिकता आणि इमारत प्रस्ताव विभागातील भ्रष्टाचार निपटून काढण्याची मागणी केली.