अमिताभच्या हस्ते उद्घाटन केलेला 'स्वच्छ मुंबई'साठीचा 'लोगो' वापराविना पडून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अमिताभच्या हस्ते उद्घाटन केलेला 'स्वच्छ मुंबई'साठीचा 'लोगो' वापराविना पडून

Share This
मुंबई : 'स्वच्छ मुंबई' प्रबोधनासाठी पालिकेने खास अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन केलेला 'लोगो' वापरण्यास पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नकार दिल्याने तो वापराविना पडून आहे. ही खेदजनक बाब असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी स्थायी समिती बैठकीत सांगितले.



२0१३ नंतर या लोगोचा वापर झालेला नाही, असेही ते म्हणाले. हा लोगो तयार करणार्‍या कलाकारांनी त्याचे ५५ लाख रुपयांचे देयक पालिकेकडे पाठवले. ते पालिकेने दिले आहे, पण हा 'लोगो' वापरला जात नाही, अशी धक्कादायक माहिती आंबेरकर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली. सरकारी यंत्रणा असे 'लोगो' तयार करण्याआधी स्पर्धांचे आयोजन करतात, अशी माहिती देशपांडे यांनी देताना 'आरबीआय'चे उदाहरण दिले. अशी स्पर्धा महापालिकेने का घेतली नाही, याचा खुलासा पालिकेने करावा, अशी मागणी त्यांनी केली. याच्याशी संबंधित अधिकार्‍यांचीदेखील चौकशी करण्याची मागणी आंबेरकर व देशपांडे यांनी केली. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत यासंबंधी माहिती देण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages