२१ ते २२ एप्रिलला कुर्ला भागात पाणी बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२१ ते २२ एप्रिलला कुर्ला भागात पाणी बंद

Share This
मुंबई : येत्या मंगळवारी सकाळी १0 (२१) ते बुधवारी (२२) रात्री ८ पर्यंत कुर्ला पूर्व आणि पश्‍चिमेकडील काही भागांत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कुर्ला पश्‍चिम येथील नाल्याखालून टाकलेली नवीन जलवाहिनी ही मुख्य जलवाहिनीला (कुर्ला दक्षिण १२00 मिमी) जोडण्याचे काम ३४ तास चालणार असल्याने, कुर्ला पश्‍चिमेला प्रभाग क्र. १५४ ते १६२, १६३ आणि १६४ चा काही भाग, काजूपाडा जलवाहिनी, गुरुनानक नगर, नारायण नगर, एलबीएस मार्ग, महिंद्र पार्क ते महाराष्ट्र वजनकाटा, शीव-कुर्ला स्थानक, तकिया वॉर्ड, पाईप रोड, हॉल रोड, ब्राह्मणवाडी, न्यू मिल मार्ग, कमानी ख्रिश्‍चन गाव आणि कुर्ला पूर्वेला कसाईवाड्याचा काही भाग, चुनाभट्टी, स्वदेशी मिल मार्ग, चुनाभट्टी पंपिंग या भागात पाणी बंद राहणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages