एम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या अनिल पाटणकर यांची भाजपला साथ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या अनिल पाटणकर यांची भाजपला साथ

Share This
पाटणकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी )- मुंबई महानगरपालिकेत सुरु असलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत  एम पश्चिम येथिल अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  भाजपचे महादेव शिवगण निवडून आले या निवडणुकीत   सलग दोन वेळा  प्रभाग समिती अध्यक्ष असलेले  अनिल पाटणकर यांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्यामुळे समसमान संख्या असूनही शिवगण निवडून आले . दरम्यान पाटणकर यांनी केलेल्या या कृतीचा वार्ड  क्रमांक १४५ चे माजी नगरसेवक गौतम साबळे यांनी निषेध केला असून त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे . 

मुंबई महानगरपालिकेच्या  एम प्रभागात काँग्रेसचे वंदना साबळे ,संगीता हंडोरे , सीमा माहुलकर आणि अनिल पाटणकर असे चार नगरसेवक असून सेनाभाजपचे सुप्रदा फातर्पेकर ,जयश्री पालंडे,दीपा परब आणि महादेव शिवगण असे सदस्य आहेत . प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने  साबळे यांना तर भाजपने शिवगण यांनी उमेदवारी दिली होती . महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत आज प्रभाग समिती अध्याक्ष्पाची निवडणूक घेण्यात आली यात शिवगण यांना  पाच  तर साबळे यांना चार सदस्य असताना तीन मते पडली . कोङ्ग्र्स्च्य चार नगरसेवकांपैकी अनिल पाटणकर यांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्यामुळे कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली प्रभाग समिती आमच्या हातची गेली असून पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या पाटणकर यांचे नगरसेवक पद रद्द करणायत यावे अशी मागणी काँग्रेसचे माजी नगरसेवक गौतम साबळे यांनी केली आहे यासंदर्भात पक्षाच्या वारीष्टांकडे लेखी तक्रार करण्यात येईल अशी माहिती साबळे यांनी दिली 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages