मुंबई (प्रतिनिधी): देशाची राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर झाडे कापली जात असल्याने पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे त्याचा फटका मुंबई कराना बसत आहे .पालिकेच्या टी विभागातील नाहूर गाव, मुलुंड पश्चिम येथील असे एकूण २४६ झाडे कापण्याच्या प्रस्तावाप्रकारणी आज वृक्ष प्राधिकरण समिती मध्ये चांगलेच पडसात उमटले. अखेर झाडे कापण्याचा प्रस्ताव पालिका आयुक्त यांनी नोट टेकन केले आणि दोन्ही ठिकाणी प्रथम पाहणी करण्याचे निर्णय घेतला.
पालिकेच्य टी विभागातील नाहूर गाव मुलुंड पश्चिम येथील नगर भूक़्र-५४३,५४६,५४६/१ ते २ आणि भूक्र-४७५,४७५/१ ते ११ येथील एकूण २४६ झाडे कापण्याच्या पालिकेच्या प्रस्तावास सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी वृक्ष प्राधिकरण समितीत कडाडून विरोध करत दोन्ही प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी केली . त्यांच्या मागणीला सर्व पक्षीये सदस्यांनी पाठींबा दिला. या मागणीस शिवसेना सदस्य रमेश कोरगावकर तसेच बाजार व उद्यान समिती अध्यक्ष अमित भंडारी यांनी पतीम्बा दिल्यानंतर हे दोन्ही प्रस्ताव पालिका अति. आयुक्त यांनी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला या वेळी सदर दोन्ही ठिकाणी पाहणी करण्याचाही निर्णय घेतला.
नाहूर गावचा न.भू. क्र ५४३ मुलुंड पश्चिम येथील प्रस्तावित निवासी ईमारत क्र. १ च्या कामात अडथला आणणारी ९९ झाडे कापण्यास व १६६ झाडे पुनरोपित करण्यास परवानगी मिळण्याबाबतचा तसेच न.भू. क्र ५४६,५४६/१ ते २ आणि मुलुंड पश्चिम गावचा ४७५,४७५/१ ते ११ येथील प्रस्तावित निवासी ईमारत क्र. १ (टोवर ए व बी ) च्या कामात अडथला करणारी १४७ झाडे कापण्यास व २८८ झाडे पुनरोपित करण्यास परवानगी मिळावी या संबंधीचा प्रस्ताव मे. ओबेरॉय यांच्याकडून प्राप्त झाला होता. मात्र येवड्या मोठ्या प्रमाणात झाडे कापण्याची खरोखरच गरज आहे का, असा सवाल सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला. त्याचबरोबर झाडे कापण्याची परवानगी दिल्यानंतर आणि झाडे कापल्यानंतर झाडांचे पुनरोपण योग्य प्रमाणात होत नसल्याचा आक्षेप घेतला यामुळे सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याची आवशकता व्यक्त करून त्यांनी सदर दोन्ही प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी केली.

