तीन महिन्यात राज्यातील तब्बल ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तीन महिन्यात राज्यातील तब्बल ६०१ शेतक-यांच्या आत्महत्या

Share This
मुंबई - अवकाळी पाऊस, गारपिट आणि दुष्काळाच्या तडाख्यात यंदा राज्यातील बळीराजा होरपळत आहे. नापिकी आणि डोक्यावरचे कर्ज यामुळे शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात तब्बल ६०१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. हे प्रमाण पाहता प्रत्येक दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करतात असल्याचे राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

२०१४ मध्ये शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण एक हजार ९८१ होते. यावर्षी केवळ तीन महिन्यात शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण ३० टक्क्यांवर पोहोचले आहे. आधीच दुष्काळ आणि त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतक-यांच्या अडचणीत अधिकच भर पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान विदर्भातील ३१९ शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकाल. तर त्यापाठोपाठ क्रमांक लागतो तो मराठवाड्याचा. गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील २१५ शेतक-यांना स्वत;हून आपले जीवन संपवले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages