मुबई / अजेयकुमार जाधव
मुस्लिम समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार संजय राऊत आणि त्याबाबत लिखाण प्रसिद्ध करणारे दैनिक सामना यांचा निषेध करत बुधवारी ( १६ एप्रिल ) आझाद मैदानात दैनिक सामनाचे अंक पेटवून होळी करण्यात आली.
मुस्लिम समाजाची नसबंदी करा त्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्या असे वादग्रस्त वकतव्य करणारे दैनिक सामनाचे संपादक आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यानी केले होते. राऊत यांनी असेच वादग्रस्त लिखाण दैनिक सामना मधून केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचा आणि लिखाणाचा निषेध करत समाजवादी पक्षाचे राज्य अध्यक्ष अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात बुधवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी दैनिक सामनाचे अंक जाळून सामनाची होळी करण्यात आली. निदर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, संसदेने संजय राऊत यांच्या वक्ताव्याची दखल घेवुन त्यांची खासदारकी रद्द करावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आझमी यांनी केली.

