कोकण रेल्वेवर पुन्हा डबलडेकर एसी एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोकण रेल्वेवर पुन्हा डबलडेकर एसी एक्स्प्रेस सुरू होण्याची शक्यता

Share This
मुंबई : प्रवाशांचा कमी प्रतिसाद आहे, असे कारण पुढे करून, बंद करण्यात आलेली डबलडेकर एसी एक्स्प्रेस पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही गाडी प्रिमियम म्हणून चालवण्याऐवजी नियमित एक्स्प्रेस म्हणून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून, ती एसी चालवल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा रेल्वे अधिकार्‍यांचा विश्‍वास आहे. सुट्टीच्या हंगामात ही गाडी प्रिमिअम म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला असला तरीही प्रवाशांकडून मात्र कमी प्रतिसाद मिळाला. या गाडीचे दर व त्यासंबंधी प्रवाशांना दिलेली माहिती यातून कमी प्रतिसाद मिळाल्याची शक्यता मध्य रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहे.

या एक्स्प्रेसच्या देखभालीचा कालावधी जवळ येऊन ठेपल्यामुळे ही सेवा तात्पुरती स्थगित केली होती, पण ही सेवा पूर्ववत करण्याचा विचार रेल्वेचे अधिकारी करत आहेत. त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात आहेत, असे मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक आर.डी. शर्मा यांनी सांगितले. ही रेल्वे मध्य रेल्वेवरच चालवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ही गाडी सुरुवातीस एलटीटीवरून सोडली जात असे. ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास प्रवाशांना योग्य असलेली वेळ ठरवण्याचा विचार सुरू आहे, असे ते म्हणाले. ही गाडी नियमित सेवेनुसार चालवल्यास त्यातील प्रवाशांना प्रिमिअम सेवेचे कोणतेही बंधन नसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages