बेस्टची श्वेतपत्रिका काढा - केदार होंबाळकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टची श्वेतपत्रिका काढा - केदार होंबाळकर

Share This
मुंबई । अजेयकुमार जाधव 
बेस्ट समितीच्या बैठकीमधे कित्तेक मुद्दे चर्चीले जातात, काही हरकतीचे मुद्दे मांडले जातात. यावर समितीच्या बैठकीत चर्चाही केली जाते. परंतू पुढे त्यावर काहीही कारवाई होत नसल्याने बेस्टमध्ये उपस्थीत होणाऱ्या मुद्याबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केदार होंबाळकर यानी हरकतीच्या मुद्द्या द्वारे केली आहे.

बेस्ट समितीत बस मधील सीसीटीव्ही, प्यासेंजर इंफोर्मेशन सिस्टम, केएलजी, स्पार्क एनर्जी या मुद्द्यावर कित्तेकवेळा चर्चा झाली आहे. बेस्टमधील फ़क्त 1600 बसेस मधे सीसीटीव्ही आहेत त्यापैकी कित्येक सीसीटीव्ही बंद आहेत. स्पार्क वीज निर्मिती कंपनीवर करोडो रुपये खर्च झाले आहेत. परंतू अद्याप वीज निर्मिती झालेली नाही. केएलजी सिस्टमवर खर्च केला गेला आहे परंतू या सिस्टमला विरोध आहे. बेस्टने दोन महिन्यात दोन वेळा दरवाढ केली आहे. ही दरवाढ करताना बेस्ट प्रवाश्याना काय मिळणार ? प्रवाशाना काय चांगली सेवा देणार? बस स्वच्छ ठेवणार का? असे प्रश्न केदार होंबाळकर यांनी उपस्थित केले. 

बस आणि स्टॉप या मधे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. हे अपघात कमी करण्यासाठी कोणते उपाय केले जाणार आहेत. बेस्टची 2 रुपये दरवाढ केली त्या प्रमाणात बस चालवल्या जाणार का? या सर्व प्रश्न आणि समस्याबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केदार होंबाळकर यांनी केली. श्वेतपत्रिका काढल्यावर यावर चर्चा करून पुढे बेस्टच्या कारभारावर लक्ष ठेवण्यात यायला हवे, बेस्टची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे होंबाळकर यांनी म्हटले आहे.  दरम्यान याबाबत लवकरच श्वेतपत्रिका काढू असे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यानी सांगीतले. तर समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यानी श्वेत पत्रिका सादर होईपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages