मुंबई (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांकरीता विविध कल्याणकारी धोरण ठरविणारी व राबविणारी पहिली महापालिका असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी सन २०१५-१६ या अर्थसंकल्पिय वर्षात महापौरांच्या अधिकारातील विकास निधीतून ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतून ज्येष्ठ नागरिक धोरणाचेप्रभावी पणेअंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेहा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयातील महापौर दालन येथे आज संयुक्त बैठक संपन्न झाली. ही बैठक महापौर या स्वतःच्या पुढाकाराने प्रती महिन्याला आयोजन करतात. आज झालेल्या बैठकीस नगरसेविका ममता (हेमांगी) चेंबुरकर, नामनिर्देशित नगरसेवक प्रा. अवकाश जाधव, उप आयुक्त (शिक्षण) रमेश पवार, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) व अधिष्ठात्री (नायर दंत महाविद्यालय) डॉ. (श्रीमती) सुहासिनी नागदा व सहायक आयुक्त (नियोजन) प्राची जांभेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, मुंबई शहरात सुमारे१५ लाख ज्येष्ठ नागरिक रहात असून त्यांना सर्वांगिण सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठ नागरिक धोरण राबविण्यात येत आहे. सन २०१५-१६ या अर्थसंकल्पिय वर्षात महापौरांनी विकास निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. शहरात व उपनगरात विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र निर्माण झाली असून या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची साधने तसेच अन्य बाबीही उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही तरतूद केलेली आहे.
पालिका शाळा तसेच उद्याने या ठिकाणीही ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या सेवा-सुविधा उपलब्ध करुन देता येईल, या संदर्भातही महापौरांनी प्रशासनाकडून आढावा घेतला. तसेच पालिका शाळांत उपलब्ध असलेल्या खुर्च्या अल्प भाडेतत्त्वावर ज्येष्ठ नागरिकांसाठी एखाद्या कार्यक्रम प्रसंगी उपलब्ध करुन देता येईल का? या संदर्भातही प्रशासनाला निर्देश दिले. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा देण्याच्या संदर्भात पालिकेकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत महापौरांनी समाधान व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी पालिकेतील रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात आलेल्या फलकाबाबतही समाधान मानले.
याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ.मनमोहनदास आचरेकर यांनी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांचे ज्येष्ठ नागरिक धोरणासंदर्भात महापौरांनी घेतलेला पुढाकार व त्या संदर्भात करण्यात आलेल्या अर्थसंकल्पिय तरतूद याचेकौतुक करीत मुंबईच्या महापौर ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असल्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच पालिका प्रशासनाकडून ज्येष्ठांसाठी इतके सकारात्मक काम होत असताना ज्येष्ठांना जे पालिका प्रशासनासाठी करता येईल त्यासाठी आम्ही तयार असल्याचे विजय औंधे यांनी सांगितले.