मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी शिवसेनेच्या यशोधर फणसे यांची फेर निवड झाली असून शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी भाजपाच्या रितु तावडे यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या विविध वैधानिक समितीच्या निवडणुका संपन्न होत आहेत. सोमवारी ( ६ एप्रिल ) स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे यशोधर फणसे याना शिवसेनेच्या 11 भाजपाच्या 3 आणि अपक्ष नगरसेवक विष्णु गायकवाड अश्या 15 सदस्यानी मतदान केले. तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या कोंग्रेसच्या वकारउनिस्सा अंसारी याना काँग्रेसची 6 व् राष्ट्रवादीची 2 अशी 8 मते मिळाली. यावेळी मनसेचे 2 सदस्य अनुपस्थित राहिले. तर समाजवादी पक्षाने तटस्थ भूमिका घेतली. यामुळे फणसे हे 15 मते मिळून पुन्हा स्थायी समिती अध्यक्ष बनले आहेत.
शिक्षण समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या रितू तावडे याना शिवसेनेची 11भाजपाची 3 व् अपक्ष नगरसेविका ज्योती अळवानी अशी 15 मते मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या विन्नी डिसोझा याना काँग्रेसची 6 व् राष्टवादीचे 1 अशी 7 मते मिळाली. शिक्षण समिती निवडणुकीमध्ये स्थायी समिती निवडणुकीप्रमाणेच मनसे अनुपस्थित राहिली तर समाजवादी पक्षाने तटस्थ भूमिका घेतली.

.jpg)
.jpg)