ताडवाडी , बीआयटी चाळीतील रहिवासी उग्र आंदोलन छेडणार
मुंबई (प्रतिनिधी) - पावसाळा जवळ आला की मुंबई तील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. काही इमारती धोकादायक नसताना सुध्दा पालिका प्रशासन त्या इमारती धोकादायक ठरवून तेथील रहिवाशांना भीतीच्या खाईत लोटत आहे. असा प्रकार पालिकेने चक्क ताडवाडी बीबीआयटी चाळीतील रहिवाशांना भीतीच्या खाईत लोटले आहे माझगाव ,ताडवाडीतील बीआयटी चाळ कमांक 1 ते 11 इमारती पालिकेने धोकादायक घोषित केल्याने रहिवासी पचंड धास्तावले आहेत पालिकेच्या या पातापाचा रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पालिकेने यापूर्वी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालाबाबत शंका उपस्थित झाल्याने स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून इमारत बांधकाम र-थैयॅतेचा अहवाल तयार केला जात आहे हा अहवाल तयार झाल्या नंतर जुना अहवाल व नवीन अहवाल पालिकेच्या तांत्रिक समितीपुढे ठेवून अंतिम अहवाल तयार करण्यात यावा तोपर्यंत या इमारतींना धोकादायक ठरू नयेत अशी मागणी र-थानिक नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे याना रहिवाशांच्या वतीने केली आहे. अन्यथा रहिवासी उग्र आंदोलन छेडतील असा इशारा ही जामसूतकर यांनी दिला आहे.
वषॅ भर झोपलेली पालिका पावसाळा तोंडावर आला की खर्चूनही जागी होते यंदाही पालिका खडबडून जागी झाली आहे. माझगाव, ताडवाडी बीआयटी चाळ कमांक 1 ते 11 या इमारतीना पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केले आहे. रहिवाशांना इतर जागेत र-थलांतरित करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालिकेच्या या प्रताबा विरोधात रहिवासी एकटवले आहेत नगरसेवक जामसूतकर यांनी याबाबत आयुक्तांनाच जबाबदार धरले आहे. जामसूतकर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन इमारती बाबतचा घोळ निदर्शनास आणून दिले आहे.
आम्ही आपणाला पूणॅ सहकार्य करू, मात्र प्रथम रहिवाशांचे म्हणणे ऐकून घ्या . या चाळींच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्वी इन्फ्रा कन्सल्टंट या पालिकेच्या पॅनलवरील कंपनीकडून करण्यात आले होते. मात्र या कंपनीने हा अहवाल बनवताना रहिवाशांना अंधारात ठेवले होते. हा अहवाल पालिका तांत्रिक समितीच्या मुख्य अभियंत्यासह चाळींच्या इमारतींची पाहणी करून ही इमारत धोकादायक आहे. अथवा नाही किंबहुना दुरुस्ती करण्याजोगी आहे, याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना आयुक्तांकडे बैठक घेऊन केली होती. त्याला आयुक्तांनी अनुकलता दशॅवली होती . त्यामुळे हा अहवाल सवाॅच्च न्यायारयात सादर न करता दोन ते तीन कंपन्या कडून इमारतीचे र-वचरल ऑडिट करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने स्ट्रक्टवेल कंपनी कडून अहवाल तयार करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे संबंधित कंपनीचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तयार केला जात आहे. हा अहवाल येण्यापूर्वीच पालिकेने या इमारतीना धोकादायक ठरवल्याने हा अहवाल आल्यानंतर तांत्रिक समिती पुढे ठेवून अंतिम धोकादायक इमारती बाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जामसूतकर यांनी केली आहे. पालिका येथील इमारतींना टेकू लावण्यास विरोध करत आहे परंतु या इमारती धोकादायक दाखलण्यासाठीच हे टेकू लावले जात असून टेकू लावलेली छायाचित्रे दाखवून तसे चित्र न्यायालयासमोर उभे केले जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन रहिवाशांनी संबंधित इमारतींना टेकू लावण्यास विरोध रहिवाशांनी केला आहे पालिकेच्या या चुकीच्या कारभाराचा फटका या रहिवाशांना बसत आहे .पालिकेने रहिवाशांची मागणी मान्य करून रहिवाशांना त्वरीत दिलासा द्यावा अन्यथा रहिवासी उग्र आंदोलन छेडतील याला जबाबदार आपण असाल असा इशारा हि नगरसेवक जामसूतकर यांनी दिला आहे .

