राज्यपाल सी. विद्यासागर राव, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महापौर स्नेहल आंबेकर, खासदार रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे आदी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बौद्ध भंते यांच्यासह सर्व मान्यवरांनी बुद्धवंदना म्हटली. यावेळी समन्वय समितीच्या पदाधिका-यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या टपाल तिकिटाची प्रतिकृती असलेली तसबीर मान्यवरांना भेट दिली.
मुंबई व आजूबाजूच्या परिसरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासून भीमसनिकांची गर्दी चैत्यभूमीवर दिसत होती. पांढरे शुभ्र वस्त्र व निळा फेटा असा पेहराव परिधान करून चैत्यभूमीवर आलेल्या शेकडो अनुयायांनी रांगा लावून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ढोल, ताशे, मृदंग यांच्या गजरात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विविध पुस्तके, ध्वनिफितींच्या स्टॉल्सवरही गर्दी दिसत होती. चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांसाठी एका सामाजिक संस्थेतर्फे बुंदीच्या लाडूंचे वितरण करण्यात येत होते.
२०१५-१६ हे वर्ष ‘सामाजिक न्याय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डॉ. आंबेडकर यांच्यावर ‘लोकराज्य’चा विशेषांक काढून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यंदा विशेषकांत डॉ. आंबेडकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवण्यात आले आहे.
![]() | ||
|

.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)