रुट एक्स्टेंशनचा 'एटीव्हीएम'मध्ये समावेश होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रुट एक्स्टेंशनचा 'एटीव्हीएम'मध्ये समावेश होणार

Share This
मुंबई : मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवर 'एटीव्हीएम' प्रणालीला प्रवाशांकडून पसंती असली तरी, त्यात मार्ग विस्तारीकरणाची (रुट एक्स्टेंशन) त्रुटी राहिल्याने रेल्वेच्या 'क्रिस' संस्थेने या प्रणालीत बदल करून त्याचा 'एटीव्हीएम'मध्ये नव्याने समावेश करण्याची सूचनाही केली आहे. 

मध्य आणि पश्‍चिम रेल्वेने अलिकडेच 'सीव्हीएम' कुपन पद्धतीला कायमचे बंद केले आहे. पण ते करताना 'एटीव्हीएम'मधील तिकिटांच्या विस्तारीकरणाचा मुद्दा दुर्लक्षिला गेल्यामुळे रेल्वेने ही चूक सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. एटीव्हीएममध्ये विस्तारीत तिकिटांसाठी कोणतीही व्यवस्था कार्यरत नसल्याने, एटीव्हीएमचे सॉफ्टवेअरसह तिकिटांच्या प्रणालीतही सुधारणा करण्याची सूचना मध्य व पश्‍चिम रेल्वेने 'क्रिस' संस्थेला केली आहे. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेने केलेल्या सूचनांच्या आधारे एटीव्हीएममध्ये योग्य ते बदल करण्यात येणार आहेत, असे एका अधिकार्‍याने सांगितले. सीव्हीएममध्ये तिकिटांच्या विस्तारीकरणाची चांगली सुविधा होती परंतु ती सुविधा एटीव्हीएममध्येही उपलब्ध करावी, अशी मागणी प्रवाशांकडून सध्या होत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages