मुंबई (प्रतिनिधी): भारत सरकारच्या आदेशानुसार संपूर्ण बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रविवार २६ एप्रिल रोजी विशेष राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. शिवाय सोमवार २७ एप्रिल ते शनिवार ०२ मे या ५ दिवसांदरम्यान घरोघरी जाऊन ५ वर्षे वयाखालील राहिलेल्या बालकांना पोलिओचे जास्तीचे डोस पाजले जातील.
तरी सर्व सुजाण पालकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येते की, हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रिय सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे व पोलिओ उच्चाटन करण्यात सिंहाचा वाटा उचलून आपल्या बालकांचे संभाव्य पोलिओपासून संरक्षण करावे.