कलानगरीच्या कामगारांचा ६ मेपासून संप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कलानगरीच्या कामगारांचा ६ मेपासून संप

Share This
मुंबई : कलानगरी (फिल्म सिटी)मध्ये विविध ठिकाणी काम करणार्‍या कामगारांची वेतनवाढ करावी, या मागणीसाठी सिने एम्प्लॉईज युनियनच्या वतीने ६ मेपासून संप पुकारण्यात आला आहे. एकीकडे कलानगरीत विविध मालिकांचे शूटिंग होत असतानाच हा संप पुकारण्यात आल्याने टीव्ही इंडस्ट्रीजला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे स्पॉट बॉईज, लाइटमन, मध्यस्थी करणारे आणि खालच्या फळीतील कामगारांच्या पगारवाढीला निर्मात्यांनी नकार दिल्याने संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज युनियनतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. या बंदमुळे कलानगरीतील पुढच्या महिन्यात सर्व टीव्ही मालिकांचे शूटिंग बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फ्वाइसचे जनरल सेक्रेटरी दिलीप पिथ्वा यांच्या मते वेतनाबाबतचा ५ वर्षांपूर्वीचा सामंजस्य करार फेब्रुवारीअखेरीस कालबाह्य झाला. त्यामुळे मार्च महिन्यात एक नवीन करार बनवून निर्मात्यांना पाठवण्यात आला होता. यामध्ये टीव्ही शोजच्या कामगारांसाठी काही टक्के वेतनवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र निर्मात्यांना हे मान्य नसल्याने आम्ही आमच्या सगळय़ा कामगारांना ६ मेपासून संपावर जायला सांगितले आहे. तसेच य निर्मात्यांना निर्णय घेण्यासाठी मेपर्यंतची मुदत दिल्याचेही त्यांनी सांगितले, तर या संपामुळे टीव्ही इंडस्ट्रीला खूप नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मागण्या अवास्तव आहेत. एकप्रकारे यामुळे आम्हाला वेठीस धरण्यात येत आहे, असे एका निर्मात्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कामगारांनी तब्बल ४0-५0 टक्के पगारवाढ मागितली असून ती निर्मात्यांना अवास्तव वाटत आहे. त्यामुळे या प्रकरणी सध्या बोलणीसाठी चर्चा सुरू असल्याचे समजते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages