मुंबई : मराठी नाट्यक्षेत्रात नावाजलेल्या 'सुयोग' नाट्यसंस्थेचे दिवंगत संस्थापक सुधीर भट यांनी गोपाळ अलगेरी यांच्याशी केलेल्या भागीदारीवरून सुमारे दीड वर्षांनी वाद उद्भवला आहे. 'स्व. सुधीर भट हेच सुयोगचे ७५ टक्के भागीदार असून उपकार म्हणून त्यांनी अलगेरी यांना २५ टक्के भागीदारी दिली होती; पण सुधीर भट यांच्यानंतर सुयोगची सर्व मक्तेदारी आणि संस्था स्वत:कडे घेण्याची हालचाल अलगेरी यांनी सुरू केली. याबाबत त्याला कायदेशीर नोटीस बजावली असून त्याने येत्या १५ दिवसांत उत्तर दिले नाही तर न्यायालयात दिवाणी किंवा फौजदारी दावा करण्यात येईल, अशी माहिती सुधीर भट यांच्या पत्नी कांचन व त्यांचे वकील शिरीष देशपांडे आणि अँड़ एच. एच. नागी यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
सुधीर भट आणि अलगेरी यांच्यात १ एप्रिल २00३ पासून ही भागीदारी झाली असून, त्याबाबतची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असा दावा कांचन भट यांनी करून त्या म्हणाल्या, ' २५ टक्के भागीदारी असूनही गोपाळने त्यांच्या वारसदारांना घेऊन मला व संदेश भट यांना जवळ येऊ दिले नाही. दोनदा त्यांच्याकडे या विषयी बोलण्याचा प्रयत्न केला असता तो खोटं बोलला आणि संगनमताने चुकीच्या गोष्टी सांगून आमची दिशाभूल करून 'सुयोग' स्वत:च्या ताब्यात कशी घेता येईल, याचा प्रयत्न करू लागला आहे. अलगेरी आता 'सुयोग'चा निर्माता म्हणून 'सुयोग' बॅनरवर 'लगीनघाई' हे नाटक काढून स्वत:चे नाव वापरत आहे. ७५ टक्के भागीदारी असणार्या मला व माझ्या मुलाला त्यांना विश्वासात न घेता हे सर्व केले आहे. वकिलांद्वारे नोटीस देऊन किंवा आम्हाला विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या.
भागीदारी रद्द झाली नसतानाही अलगेरी सुयोगचा मालक कसा बनेल, असा सवाल करून कांचन भट म्हणाल्या, ' सुधीर भट यांच्या निधनानंतर अलगेरी माझी चौकशीही करण्यास आला नाही. 'तुला हिशोब मिळणार नाही, तू व तुझा मुलगा यांचा इथे काय संबंध, 'सही रे सही'च्या प्रत्येक 'शो'चे एक हजार रुपयांचे पाकीट मिळते ते घ्या नाहीतर तेदेखील बंद करेन, असे अलगेरी उर्मट बोलतो, जास्त बोलायचे नाही. इथून निमूटपणे जा, तुमच्यात धमक असेल तर कोर्टात जा, काय पाहिजे ते कर. आता मालक मीच बनणार आहे, अशी भाषा अलगेरी माझ्याशी करतो, असा आरोप त्यांनी केला.