मुंबई -०2 ( प्रतिनिधी ) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगाराच्या हिताचे कायदे बनविले होते. त्यात कामगारासाठी स्वत:च्या संरक्षाणार्थ "संप" करण्याची मुभा ठेवण्यात आली होती मात्र कामगार हिताचे कायदे निर्माण करायचे अपेक्षित असतांनाही देशातील कारखानदार, भांडवलदार व मालक वर्गांनी इंडस्ट्री पॅालिसी बनवण्याऐवजी कामगारविरोधी कायदे तयार केले असल्याची घणाघाती टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी केली
ते २६० अन्वये राज्यातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी कामगार कायद्यात मोठे बदल करण्यासंदर्भात विधानपरिषदेत नियम २६०अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता सदर प्रस्तावावर बोलताना भांडवलधारी कारखानदारांवर प्रा. कवाडे यांनी चौफेर हल्ला चढविला . आजचा कामगार गोंधळाच्या वातावरणात सापडला आहे. कामगाराच्या संरक्षणाचे व हिताचे कायदे नसल्यामुळे त्यांचे शोषण होत आहे तर भांडवलदार, उद्योगपतींचे संरक्षण करणारेच कायदे अधिकआहेत. त्यामुळे आजचा कामगार हा असुरक्षित, असंघटीत आहेअशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली .
आपल्या देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे पहिले मजूरमंत्री म्हणून काम करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगाराच्या हिताचे अनेक कायदे बनविले होते. त्यात कामगारासाठी स्वत:च्या संरक्षाणार्थ "संप" करण्याची मुभा ठेवण्यात आली होती. परंतु कामगाराचे एकमेव असलेले हे हत्यार कामगारांकडून हिरावून घेण्यात आले व कामगारांचे संप संपविले पण कारखानदारांनी नव्याने अवलंबलेले आपल्या हिताचे टाळेबंदी कायदा निर्माण करण्यात आला . कारखानदार, भांडवलदार, गुं तवणूकदार, उद्योगपती यांनी आपल्या हिताचे कायदे निर्माण करून कष्टकरी कामगारांच्या हिताचे रक्षण करणारे कायदे आपण तरी करणार काय असा खडा सवाल कवाडे यांनी राज्य शासनाला केला.
कायद्याचे पालन न करणाऱ्या कारखानदाराला संरक्षण आहे परंतु आपल्या हितासाठी लढणाऱ्या कामगारांवर मात्र फौजदारी गुन्हे आहेत. हा त्यांच्यावरिल अन्यायच असल्याचे प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी सांगितले.
जगातील सर्व कामगारांच्या क्रांत्या कष्टकरी, कामकरी लोकांनीच केल्या आहेत पण सरकार त्याच्या साठी काम करण्याचे सोडून पुंजीपतींच्या संरक्षणासाठी असल्याचा खेद व्यक्त करीत कामगारांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याची ग्वाही आतातरी सरकारने घ्यावी अशी अपेक्षा प्रा. कवाडे यांनी व्यक्त केली .
ते २६० अन्वये राज्यातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी कामगार कायद्यात मोठे बदल करण्यासंदर्भात विधानपरिषदेत नियम २६०अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता सदर प्रस्तावावर बोलताना भांडवलधारी कारखानदारांवर प्रा. कवाडे यांनी चौफेर हल्ला चढविला . आजचा कामगार गोंधळाच्या वातावरणात सापडला आहे. कामगाराच्या संरक्षणाचे व हिताचे कायदे नसल्यामुळे त्यांचे शोषण होत आहे तर भांडवलदार, उद्योगपतींचे संरक्षण करणारेच कायदे अधिकआहेत. त्यामुळे आजचा कामगार हा असुरक्षित, असंघटीत आहेअशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली .
आपल्या देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळाचे पहिले मजूरमंत्री म्हणून काम करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगाराच्या हिताचे अनेक कायदे बनविले होते. त्यात कामगारासाठी स्वत:च्या संरक्षाणार्थ "संप" करण्याची मुभा ठेवण्यात आली होती. परंतु कामगाराचे एकमेव असलेले हे हत्यार कामगारांकडून हिरावून घेण्यात आले व कामगारांचे संप संपविले पण कारखानदारांनी नव्याने अवलंबलेले आपल्या हिताचे टाळेबंदी कायदा निर्माण करण्यात आला . कारखानदार, भांडवलदार, गुं