मुंबई : शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या गच्चीवरील हॉटेलचा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत फेटाळल्यानंतर नामुश्की ओढवलेल्या शिवसेनेने हा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांच्यासह भाजपनेही याला विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. मात्र युवानेते आदित्य ठाकरे यांची ही कल्पना साकारण्यासाठी शिवसेनेने भाजपचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मुंबईतील इमारतींच्या गच्चीवर हॉटेलसाठी पालिकेने परवानगी द्यावी अशी संकल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. समाजवादी पार्टीच्या मदतीने हा प्रस्ताव पालिकेच्या सुधार समितीत आला होता. मात्र यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसह सत्ताधारी भाजपनेही शिवसेनेच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. बहुमतानंतर हा प्रस्ताव सुधार समितीत फेटाळण्यात आला होता. भाजपनेही शिवसेनेची साथ सोडल्याने त्यामुळे आदित्य ठाकरे यांची ही कल्पना साकार कशी करावी हा प्रश्न सध्या सत्ताधारी शिवसेनेपुढे आहे. नाईट लाईफ बरोबर गच्चीवरील हॉटेलला पालिकेने परवानगी द्यावी अशी कल्पना आदित्य ठाकरेंनी मांडली होती. यापूर्वी दोनवेळा सुधार समितीत हा प्रस्ताव शिवसेनेने सादर केला. मात्र आजूबाजूच्या इमारतींना त्याचा त्रास, शिवाय सुरक्षितता आदी प्रश्न उपस्थित करीत भाजपने या प्रस्तावांना सुरुवातीपासून विरोध केला. सुधार समिती अध्यक्ष उज्वला मोडक यांनी बहुमत घेतले. मात्र बहुमताने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यानंतर एलईडीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपची कोंडी केली. शिवसेना- भाजपमधील धुसफूस आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वी विकास निधी वाटप प्रकरणात अडचणीत आलेल्या महापौरांच्या विरोधात असलेला विरोधकांच्या सूरात सूरही भाजपच्या काही नगरसेवकांनी मिसळल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान गच्चीवरील हॉटेलचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेची धावपळ सुरू झाली असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी येत्या पालिका सभागृहात हा विषय चर्चेला येईल. त्यावेळीच या प्रस्तावावरील भूमिका कोणाची कशी असेल हे स्पष्ट होईल, असे सांगितले. तर या प्रस्तावाला आमचा विरोध कायम असेल असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी स्पष्ट केले.