मुंबई- ०१ -(प्रतिनिधी )- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब भाजप नेते गोपीनाथ मुंडे या मोठ्या नेत्यांची स्मारके महाराष्ट्रात होवू शकतात तर मग डान्सबार बंदीसह अनेक धाडसी निर्णय घेणारे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे स्मारक का होवू शकत नाही असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी विधानपरिषदेत केला महाराष्ट्रातील मागा सवर्गीयांवरील वाढते अत्याचार ,पोलिस हत्या , एम .डी.सारख्या गुन्ह्यात पोलिसचा सहभाग, सामाजिक बहिष्कार, लहान मुलींवर बलात्कार चर्चेसवर दगडफेक आदि घटना पाहता या सरकारकडूनही जनतेचा भ्रमनिरास झाला असून देशातील ३१ राज्यांपेक्षा चांगले राज्य ठेवू असे अभिवचन सरकारने द्यावे अशी मागणीही गजभिये यांनी केली .
महाराष्ट्र विधानपरिषद नियम २६० अन्वये विधानपरिषदेत कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चा उपस्थित करण्यात आली होती . या चर्चेत भाग घेताना राज्यातील मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचारांसह कॉ. गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हल्ल्याचा गजभिये यांनी निषेध केला.आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली म्हणून सरकारवर तुटून पडणारे एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस विनोद तावडे आणि सुधीर मुन्गान्तीवर या नेत्यांची भाषणे आम्ही ऐकली आहेत आघाडी सरकारने काही केले नाही म्हणून दलित आदिवासी गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताचा दावा करणारे हे सरकार आम्हाला तक्रार करायला संधी देणार नाही असे आपल्याला वाटले होते मात्र नगर येथील आणि महाराष्ट्रातील मागासवर्गीयां वरील वाढते अत्याचार ,पोलिस हत्या , एम .डी.सारख्या गुन्ह्यात पोलिसचा सहभाग, सामाजिक बहिष्कार, लहान मुलींवर बलात्कार चर्चेसवर दगडफेक आदि घटना पाहता या सरकारकडूनही जनतेचा भ्रमनिरास झाला आहे अशी टीका गजभिये यांनी केली .
राज्यात श्रीमंत ,गर्भश्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या हत्या पैशासाठी होतात मात्र पानसरे, दाभोलकर यांच्या हत्या करून गुन्हेगारांना किती कोटी रुपये मिळाले असतील असा सवाल गजभिये यांनी केला राज्यातील जनतेला समानतेच्या मार्गाकडे नेणारे ज्योतिबा फुले शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हि माणसे खासदार किवा प्रधानमंत्री नव्हती मात्र त्यांच्या विचारांना मूठमाती देण्याचे काम काम कोणती गुन्हेगारी यंत्रणा करीत आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली
राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची स्मारके उभी करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यांच्यासोबतच डान्सबारबंदी ,महात्मा गांधी तंटामुक्ती योजना ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यासारखी कामे दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना फाशी, अरुण गवळी यांसारख्या अनेक गुंडांना त्यांनी अटक केली , त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांचेही यथोचित स्मारक महाराष्ट्रात उभे करावी अशी मागणी गजभिये यांनी केली .
महाराष्ट्र विधानपरिषद नियम २६० अन्वये विधानपरिषदेत कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चा उपस्थित करण्यात आली होती . या चर्चेत भाग घेताना राज्यातील मागासवर्गीयांवरील अन्याय अत्याचारांसह कॉ. गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हल्ल्याचा गजभिये यांनी निषेध केला.आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुन्हेगारी वाढली म्हणून सरकारवर तुटून पडणारे एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस विनोद तावडे आणि सुधीर मुन्गान्तीवर या नेत्यांची भाषणे आम्ही ऐकली आहेत आघाडी सरकारने काही केले नाही म्हणून दलित आदिवासी गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताचा दावा करणारे हे सरकार आम्हाला तक्रार करायला संधी देणार नाही असे आपल्याला वाटले होते मात्र नगर येथील आणि महाराष्ट्रातील मागासवर्गीयां