स्थापत्य समिती अध्यक्षपदी संपत ठाकूर, दीपक भूतकर तर आरोग्य समिती अध्यक्षपदी सुनिता यादव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्थापत्य समिती अध्यक्षपदी संपत ठाकूर, दीपक भूतकर तर आरोग्य समिती अध्यक्षपदी सुनिता यादव

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०१५-१६ च्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी सेना-भाजपा – रिपाई (आठवले गट) महायुतीचे संपत ठाकूर, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदी दीपक भूतकर तर सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदी सुनिता यादव निवडून आले आहेत.

महानगरपालिकेच्या सन २०१५-१६ च्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदासाठी आज (दिनांक १६ एप्रिल, २०१५) झालेल्या निवडणुकीत सेना-भाजपा – रिपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार संपत ठाकूर यांना १९ मते मिळून ते विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अनिता रमेश यादव यांना १० मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा-सेना – रिपाई (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार ज्योत्स्ना देवेश मेहता यांना १९ मते मिळून त्या विजयी झाल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीच्या रत्ना महाले यांना १० मते मिळाली. या निवडणुकीत २९ सदस्यांनी भाग घेतला. ६ सदस्य अनुपस्थित होते. तर १ सदस्य तटस्थ होते.

स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सेना-भाजप – रिपाई (आठवले गट) महायुतीचे उमेदवार दीपक रामचंद्र भूतकर यांना १९ मते मिळून ते विजयी झाले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार उषा अनिल कांबळे यांना ९ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-सेना – रिपाई (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार ज्योती अळवणी यांना १८ मते मिळून त्या विजयी झाल्या, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीच्या सविता शरद पवार यांना ८ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण २८ सदस्यांनी भाग घेतला. ६ सदस्य मतदानाला अनुपस्थित होते, तर १ सदस्य तटस्थ राहिले. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एका सदस्याचे मत बाद झाले.

सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदासाठी आज (दिनांक १६ एप्रिल, २०१५) झालेल्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना- अखिल भारतीय सेना- रिपाई (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार सुनिता रामनगिना यादव यांना १८ मते मिळून त्या विजयी झाल्या, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे योगेश भोईर यांना ९ मते मिळाली. एकूण ३३ सदस्यांपैकी २७ सदस्यांनी या निवडणुकीत भाग घेतला, त्यापैकी ५ सदस्य अनुपस्थित व १ सदस्य तटस्थ होते. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सेना-भाजप – अखिल भारतीय सेना- रिपाई (आठवले गट) महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती बावदाणे यांना १८ मते मिळून त्या विजयी झाल्या, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस -  काँग्रेस आघाडीचे नंदकुमार वैती यांना ९ मते मिळाली. ५ सदस्य अनुपस्थित होते, तर अध्यक्षपदाच्या मतदानाच्यावेळी उपस्थित असलेले एक सदस्य उपाध्यक्षपदाच्या मतदानाच्या वेळेस अनुपस्थित होते.
Displaying BMC_1742.JPG
Displaying BMC_2066.JPG
Displaying BMC_1908.JPG
Displaying BMC_2358.JPG
Displaying BMC_2533.JPG



Post Bottom Ad

JPN NEWS

Pages