मुंबई : पूर्व उपनगरातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने गोवंडी येथील शताब्दी सर्वसाधारण रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पूर्व उपनगरात प्रवेश करताना होणारे रस्ते अपघात, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणारे कुपोषणाचे प्रमाण पाहता पूर्व उपनगरात आरोग्य सेवांचे अधिक बळकटीकरण करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत पूर्व उपनगरातील आरोग्य सेवेचा ताण लोकमान्य टिळक रुग्णालय आणि गोवंडी शताब्दी रुग्णालयावर आहे. या रुग्णालयाची ३00 रुग्ण शय्येची क्षमता आहे. येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाल्यास येथे अतिरिक्त ६00 रुग्ण शय्येची वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकते. एमएमआरडीएची दोन एकरची जमीन वगळता, गोवंडी महापालिका रुग्णालयाचा साडेआठ एकरचा परिसर व आवश्यकता वाटल्यास त्याच्या बाजूने रिक्त असलेली जागा धरून वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुमारे १0 एकर जमीन उपलब्ध होऊ शकते, असे महापौरांनी पत्रात नमूद केले.