मुंबई । अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या अखत्यारीतील सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेले आठ महिने पगार मिळाला नसल्याने शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या शिक्षण समिती बैठकीमध्ये महिला नगरसेविकानी आपल्या महिला शक्तीची ताकद दाखवताच शिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत्या चार ते पाच दिवसात पगार देण्याचे मान्य केले आहे.
सर्व शिक्षण अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या 11 कर्मचार्याना गेल्या 8 महिन्या पासून पगार मिळालेला नाही. पगार नसल्याने याकर्मचाऱ्यांच्या घरी हालाकाची परिस्थिती आहे. याकर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही तर महिलाकर्मचाऱ्यांना वेश्या व्यवसाय करून घरे चालवावी लागतील. एका कर्मचाऱ्याच्या मुलाचे लग्न 11 में ला आहे. अश्याकर्मचाऱ्यांच्या घरच्या परिस्थितीचा विचार करावा आणि त्वरीत पगार द्यावा अशी मागणी नगरसेविका यामीनी जाधव यांनीहरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.
यामीनी जाधव यांच्याहरकतीच्या मुद्द्यालापाठींबा देताना शीतल म्हात्रे यांनी पगार न देणाऱ्या शिक्षण विभागाचे उप आयुक्त व् शिक्षणअधिकारी यांचाच पगार थांबवा, याअधिकाऱ्यांच्या पगारतील अर्धा पगार सर्व शिक्षा अभीयानातील कर्मचाऱ्यांना दया म्हणजे या अधिकाऱ्यांना याची जाण येईल असे सांगीतले. प्रकाश दरेकर यांनी नीट काम करता येत नसेल तर अश्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याची मागणी केली. अपक्ष नगरसेविका ज्योती अळवणी यांनी पगार न काढणाऱ्या अकाउंटन्ट वैशाली यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी नगरसेवक आणि विशेष करून महिला नगरसेवीकानी घेतलेली संतप्त भूमिका बघून उप आयुक्त रमेश पवार यांनी या कर्मचार्यांना ५ मी रोजी पगार देवू असे स्पष्ट केले. परंतू ५ मे ला प्रशासकीय अधिकारी आणि कार्यालय बंद असेल, सुट्टी असेल मग पगार कोण देणार असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित करत ताबडतोब पगार द्या अशी मागणी केली.
यावर येत्या 4 ते 5 दिवसात पगार देवू असे उप आयुक्त पवार यांनी जाहिर केले. तसेच याकर्मचाऱ्यांना पालिका सेवेत कायम करण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने सर्व शिक्षण समिती सदस्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन पवार यांनी केले. यावर शिक्षण समिती अध्यक्षा रितु तावडे यांनी याकर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळण्यासाठी मी स्वत लक्ष देइन, पाठ पुरावा करेन असे आश्वासन समिती सदस्यांना दिले.

