मुंबई / अजेयकुमार जाधव :
मुंबई मध्ये दिवसेंदिवस महिला व खास करून बालिकांवर होणारे वाढते अत्याचार लक्षात घेत मुलींना पोलीस स्टेशन मध्ये एनसी व एफ आय आर कसे दाखल करावे याबाबतचे मार्गदर्शन करणे हि काळाचे गरज आहे. याकरिता प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षणा बरोबर आय पी एस धारा ३५४ / डी, ५०९ कलमांची कार्यशाळा सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर रितू तावडे यांनी सांगितले. कलम २९२ ची ओळख खास कायदे तज्ञ आणि एन. जी. ओ मार्फत पालिका शाळांमधील विध्यार्थीना करून द्यावी अशीही सूचना तावडे यांनी यावेळी केली.
विद्यार्थिनिंच्या शारीरिक स्वास्थालाही तितकेच महत्व असून त्या दृष्टिने विद्यार्थिनिंची मासिक आरोग्य तपासणी करावी व जे विध्यार्थी गुणवत्तेमध्ये मागे आहेत त्याच्यामध्ये कोणत्याची प्रकारचा न्यूनगंड येऊ नये म्हणून त्यांचे समुपदेशन होणे गरजेचे असल्याने त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवही करावी असेही तावडे यांनी सांगितले. पालिका शाळेत येणारे बहुतांशे विध्यार्थी हे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ, गरीब व गरजू घटकातील असून त्यांच्या कोंतुंबिक परीस्तीतीमुळे त्यांचे बालपण शिक्षण हरवलेले आहे. अशा विद्यार्थ्च्या गैरहजेरीचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रती प्रभाग समिती निहाय एक समुपदेशक एन. जी. ओ किवा पालीकामार्फात नियुक्त व्हावा जो सदर गैरहजर अथवा अभ्यासात मागे पडणार्या विध्यार्थ्यांना समुपदेशना द्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आणता येवू शकेल असे तावडे म्हणाल्या .
इंग्रजी हि जागतिक व्यवहाराची भाषा असल्यामुळे तिला वाढते महत्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना मातृभाषा वगळून इग्रजी भाषेकडे शिक्षणसाठी भर देण्याबरोबरच आपली मातृ भाषा विद्यार्थ्याला उत्तम रित्या येईल यासाठी शिक्षण आणि पालकांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांची घटत असलेली पटसंख्या आणि त्या तुलनेत अधिक संखेने असलेल्या शिक्षकाना शिक्षणा व्यतिरिक्त अन्य कामासाठी जुंपणे योग्य नाही. शिक्षकाने विध्यादानाचे कर्तव्य बजाविले पाहिजे असेही तावडे यांनी सांगितले. मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाला अत्यंत गुणी शिक्षक प्राप्त झाले आहेत. महापौर पुरस्कार विजेत्या शिक्षकांबरोबर राज्य आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षकांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उत्तम विनियोग शिक्षण विभागाला व्हावा म्हणून त्यांचा मार्गदर्शना खाली एक समिती नेमावी अशी सूचना नवनिर्वाचीत शिक्षण समिती अध्यक्षा रितू तावडे यांनी केली.

.jpg)