प्रस्तावित विकास आरखडयाविरोधात आझाद मैदानत आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रस्तावित विकास आरखडयाविरोधात आझाद मैदानत आंदोलन

Share This
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या नवीन नियोजित विकास आराखड्यास विरोध करण्यासाठी आज आझाद मैदान महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोशिएशन आणि अफोर्टेबल हौसिंग ऑर्गनायझेशन ओफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसांचे आंदोलन करण्यात आले. या विकास आराखड्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण असून डी,पी, आणि डी सी आर प्रसिद्ध झाल्यापासून असोशिएशनच्या कार्याल्यामध्ये असंख्य चोक्शीचे ओघ जमा झाले असल्याचे असोशिएशन प्रवक्त सुनील शर्मा यांनी यावेळी सांगितले. 


या विकास आराखड्याबाबत लोकजार्गृती करण्यासाठी संख्येच्या वतीने अनेक ठिकाणी शिबीर आयोजित करून यातील महत्वाच्या गोष्टी जनतेला समजविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर रमेश प्रभू यांनी झोपडपट्टी सेस बिल्डिंग, भाडेकरूंच्या इमारती, आणि खाजगी संस्थाच्या इमारती यांच्या  पुनर्विकासाबाबत यामध्ये कोणताही विचार झालेला नसल्याचे सांगितले. पूर्वी देण्यात येणाऱ्या सुविधा जसे बालवाडी, संस्था कार्यालय, कल्याण केंद्रे, मनोरंजन केंद्रे  हे आता एफ एस आय चा भाग झालेला आहे. अत्यंत अल्प असल्याने कोणताही विकासक पुनर्विकासाकरिता पुढे येणार नाही, अशी भीती प्रभू यांनी व्यक्त केली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages