मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी १० टक्के खर्च मुंबईच्या विकास कामाकरिता खर्च होत नाही. ही शोकांतिका असून बजेटच्या किमान ७० टक्के निधी विकास कामावर खर्च आला पाहिजे. मात्र कररूपाने जनतेकडून पैसा जमा करणारी पालिका लोकांना देण्याची वेळ येत तेव्हा त्यांना वंचित ठेवले जाते. या संदर्भात पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पावर श्वेतपत्रिका काढली पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.
मुंबई पालिकेचे नवनियुक्त आयुक्त अजेय मेहता यांची आज राष्ट्रवादीच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली यावेळी सचिन अहिर, प्रकाश बिनसाळे, रमेश कदम, गटनेते धनंजय पिसाळ यांच्यासह पालिकेतील राष्ट्रवादीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी मुंबईच्या विविध प्रश्नांवर आयुक्तांशी चर्चा केली.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना सचिन अहिर यांनी आपण आयुक्तांना नागरी सुविधा प्रकल्पांची आढावा घेऊन कधीपर्यंत पूर्ण होणार हे स्पष्ट करण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे विकास आराखड्यात विसंगती झालेली आहे. नवीन डी पी मध्ये पुनर्विकासाचे प्रकल्प परवानगी मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नवीन विकास आराखडा हा मराठीतूनच आखला पाहिजे अशी ही मागणीही त्यांनी केली. दरम्यान नवीन आयुक्तांनी यापूर्वी विजेच्या प्रश्नावर चांगले काम केले असल्याने त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत . त्यांनीही आपण केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.