डॉ. आंबेडकर स्मारक सभागृहाबाबत सकारात्मक निर्णय घेवु - प्रकाश गंगाधरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. आंबेडकर स्मारक सभागृहाबाबत सकारात्मक निर्णय घेवु - प्रकाश गंगाधरे

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समितीच्या दादर भोईवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आरक्षणात आवश्यक असणारे बदल करण्यासाठी सुधार समिती सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी बौद्धजन पंचायत समितीच्या स्मारक सभाग्रुहाला दिलेल्या भेटी दरम्यान दिले.

दादर भोईवाडा येथे जेरबाईवाडिया मार्ग येथे 1956 मधे 40 बाय 70 चौ.मी.जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात आली होती. 1974 मधे पालिकेने बौद्धजन पंचायत समितीला 1000 चौ.मी.इतका भूखंड संस्थेला कराराने देण्यात आला आहे. या भूखंडावर बौद्धजन पंचायत समितीचे मुख्य कार्यालय व स्मारक हॉल ५० ते ६० वर्षाहून अधिक काळा पासून आहे. याच भूखंडावर अतिक्रमण झालेल्या झोपड्या असल्याने 1995 नंतर एसआरए प्रोजेक्ट राबव्न्यात आल्याने संस्थेकड़े फ़क्त 495 चौ.मी. इतकाच भूखंड बाकी राहिला होता. या बाकी जागे पैकी140.12 चौ. मी. भूखंड बेघरांच्या आरक्षित करावा अशी मागणी करत उरलेल्या 350 चौ. मी. जागेवर स्मारक सभागृह बांधावे असा बदल करण्याची मागणी केली जात होती.

परंतू जो काही उरलेला भूखंड आहे तो तरी स्मारक सभाग्रुहाला मिलावा अशी मागणी पंचायत समिती आणि आंबेडकरी जनते कडून केली जात होती. गुरुवारी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे आणि सुधार समितीचे मोहन मीठबावकार, ज्योत्स्ना दीघे, श्रद्धा जाधव यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान प्रकाश गंगाधरे यांनी पंचायत समितीला स्मारक सभागृह बांधण्यासाठी सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी पंचायत समितीचे आनंदराज आंबेडकर, आर. सी. तांबे, रमाकांत यादव, लक्ष्मण भगत, किशोर मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages