१ मेपासून 'सीव्हीएम' कायमचे बंद होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१ मेपासून 'सीव्हीएम' कायमचे बंद होणार

Share This
मुंबई : येत्या १ मेपासून सर्व उपनगरी रेल्वे मार्गांवरील 'सीव्हीएम' बंद होणार आहे. यामुळे पश्‍चिम रेल्वेने प्रवाशांना एटीव्हीएम आणि मोबाईल तिकिटांचा पर्याय दिला आहे. या दोन्ही सुविधा अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहचण्यासाठी प. रेल्वेने घेतलेल्या विशेष प्रयत्नांना चांगलेच यश मिळाले असून, पश्‍चिम रेल्वेत महिन्याभरात एक लाख स्मार्ट कार्डांची विक्री झाली आहे. 


२५ मार्चपासून पश्‍चिम रेल्वेवर एटीव्हीएम कार्डची विक्री वाढवण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर तब्बल एक लाख स्मार्टकार्डची विक्री झाली आहे. दररोजच्या एटीव्हीएम कार्ड विक्रीत ५00 टक्के वाढ झाल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेत सीव्हीएम कूपन पद्धत बंद करण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ दिली. पण सीव्हीएम यंत्रणेतील त्रुटी आणि एटीव्हीएमची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याला प्राधान्य दिले. १ एप्रिलपासून सीव्हीएम यंत्रणा बंद होणार होती मात्र ही मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली. येत्या १ मेपासून 'सीव्हीएम'ना कायमचे बंद करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages