आठ वर्षात ७५३ भारतीय जवान शहीद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आठ वर्षात ७५३ भारतीय जवान शहीद

Share This
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक दरम्यान गेल्या आठ वर्षात ७५३ जवान शहीद झाल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकसभेत दिली. लोकसभेतील लेखी उत्तरादरम्यान मनोहर पर्रिकर यांनी दिली. २००७ पासून जम्मू-काश्मीरमधील ऑपरेशन रक्षक दरम्यान ७५२ भारतीय जवान हुतात्मा झाल्याचे त्यांनी सांगितले.

एकट्या २००७ या वर्षात तब्बल १७१ जवान शहीद झाले तर २००९ मध्ये ही संख्या ९३ पर्यंत घटली. मात्र २०१०मध्ये ही संख्या १०७ पर्यंत वाढली. २०१३ आणि २०१४ या वर्षात ऑपरेशन रक्षकदरम्यान अनुक्रमे ५१ आणि ५४ जवान या कारवाईदरम्यान शहीद झाले. या वर्षात २० एप्रिलपर्यंत सात भारतीय जवान शहीद झाल्याचे पर्रिकर यांनी लोकसभेत सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages