हिंदू कॉलनी परिसर ना फेरीवाला क्षेत्रच राहिल - डॉ. रणजित पाटील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हिंदू कॉलनी परिसर ना फेरीवाला क्षेत्रच राहिल - डॉ. रणजित पाटील

Share This
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुख्य निवासस्थान असलेली राजगृह ही इमारत दादर पूर्व येथील हिंदू कॉलनीत आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर ना फेरीवाला क्षेत्रच राहिल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. 

विधान परिषद सदस्य अनंत गाडगीळ, प्रा. जोगेंद्र कवाडे, धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम 101 अनुसार याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. पाटील म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ/उत्तर विभाग प्रस्तावित ना-फेरीवाला क्षेत्रात आहे. त्यामुळे राजगृह या इमारतीच्या परिसरात फेरीवाल्याच्या वावरास प्रतिबंध आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages