गोर - गरीब जनतेच्या हितासाठी बेस्टच्या विरोधात आंदोलन छेडणार – संजय निरुपम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोर - गरीब जनतेच्या हितासाठी बेस्टच्या विरोधात आंदोलन छेडणार – संजय निरुपम

Share This
मुंबईतील बेस्टच्या उपक्रमाबाबत चर्चा करण्याकरिता आज सोमवार दि. १३ एप्रिल, २०१५ रोजी दुपारी २.३० वाजता मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे शिष्ट मंडळ बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांना भेटले.      

गेल्या ३ महिन्यात बेस्टने २ वेळा तिकीट दरवाढ केल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत दोन लाखापेक्षा जास्त घट झालेली असून सतत होणाऱ्या बेस्ट तिकीट दरवाढीमुळे प्रवासी संख्या जास्तीत घटण्याची शक्यता आहे.  तसेच मुंबई शहरात बेस्ट तर्फे विद्धुत पुरवठा करण्यात येतो, त्यातही भरमसाठ वाढ केल्याने आधीच्याच वीज दराने मुंबईकर त्रस्त असून त्यात अवाजवी बोजा लादून बेस्टने तमाम मुंबईकरांचे जीवन असह्य केलेले आहे. तसेच मनपा शाळेतील विद्ध्यार्त्याना बेस्टच्या बसेस मध्ये करण्यात आलेली दुप्पट भाडेवाढ रद्द करण्यात यावी, अन्यथा  गोर - गरीब जनतेच्या हितासाठी बेस्टच्या विरोधात मुंबई कॉंग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला. 

सदर भेटी दरम्यान मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत मनपा विरोधी पक्ष नेता बाळा आंबेकर, महिला मुबई कॉंग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, बेस्ट कमिटी सदस्य रवी राजा, शिवजी सिंग, सर्व नगरसेवक / नगरसेविका, नितीन पाटील आणि भूषण पाटील उपस्थित होते. 

          

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages