म्हाडा सोडत = अंध-अपंगांच्या घरांच्या किमती सर्वाधिक असल्याचे स्पष्ट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

म्हाडा सोडत = अंध-अपंगांच्या घरांच्या किमती सर्वाधिक असल्याचे स्पष्ट

Share This
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून काढण्यात येणार्‍या अंध-अपंग प्रवर्गातील सोडतीत कांदिवली-शिंपोली येथील घरांची किंमत ६७ लाख ५७ हजार ७00 रुपये असून अंध-अपंग प्रवर्गातील उच्च उत्पन्न घरांची किमतीमध्ये सर्वाधिक असल्याचे जाहिरातीत स्पष्ट झाले आहे, तर मालाड-गायकवाड नगर येथील १६७ चौ.फुटांच्या घरांची किंमत सर्वात कमी म्हणजेच ८ लाख ९३ हजार रुपये असणार आहे. 

म्हाडा सदनिकांच्या विक्रीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास विनियम १९८१ आणि म्हाडा नियम १९८१ नुसार अंध व अपंग प्रवर्गातील मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ आणि कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध वसाहतींतील ६६ सदनिकांच्या विक्रीची जाहिरात ३१ मार्चपर्यंत काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाकडून मिळालेल्या वाढीव कालावधीनुसार मुंबई मंडळाच्या ९९७ घरांच्या सोडतीबरोबरच या प्रवर्गातील ६६ घरांची जाहिरात काढण्यात येणार आहे. या सोडतीत शिंपोली-कांदिवली व मालवणी-मालाड येथील घरांच्या किमतीबरोबरच पवईतील उच्च उत्पन्न गटाच्या १ सदनिकेची किंमत ६३ लाख २८ हजार ९३0 रुपये, अल्प उत्पन्न गटाच्या मानखुर्द इमारत १ व २च्या प्रत्येक १ घराची किंमत अनुक्रमे १८ लाख ३ हजार ९६0 रुपये व १८ लाख ७७ हजार ५५0 रुपये आहे. मालाड-मालवणी येथील १३ अल्प उत्पन्न गटाच्या घरांसाठी २२ लाख ७७ हजार ९0 रुपये किंमत ठरवण्यात आली आहे. 

शिंपोली-कांदिवली येथील अल्प गटाच्या ६ घरांसाठी २१ लाख ६९ हजार ७00 रुपये व मालाडमधील मध्यम उत्पन्न घरासाठी ३५ लाख २७ हजार १00 रुपये ठरवण्यात आली आहे, तर मध्यम उत्पन्न गटाच्या प्रतीक्षा नगरमधील घराची किंमत २७ लाख ७९ हजार ६४ रुपये, मागाठणे येथील उच्च उत्पन्न गटाच्या १ घराची किंमत १ लाख २७ हजार २५0 रुपये ठरवण्यात आली आहे. पवईतील उच्च उत्पन्न गटातील एका घराची किंमत ६२ लाख १६ हजार ९00 रुपये, मालाड येथील अल्प उत्पन्न गट २२ लाख ७७ हजार 0९0 रुपये, विनोबा भावे नगर येथील अल्प घरासाठी १८ लाख ५ हजार ५१ रुपये, मध्यम उत्पन्न घरासाठी ४३ लाख ८५ हजार ८१५ रुपये, प्रतीक्षानगर मध्यम उत्पन्न गटासाठी २८ लाख ५४ हजार २१0 रुपये, गोराई रोड बोरिवली येथील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत ६३ लाख १९ हजार ९00 रुपये, मागाठणे येथील उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत ५४ लाख ४१ हजार ७७0 रुपये आहे, तर या सोडतीत समाविष्ट असलेल्या कोकण मंडळातील मीरा रोडच्या अत्यल्प उत्पन्न गटाची किंमत १0 लाख २२ हजार ६९0 रुपये तर अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत १७ लाख ६ हजार ४८0 रुपये ठरवण्यात आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages