नाशिक :यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या परीक्षा शुक्रवार दि. ६ मे पासून राज्यभरात सुरु होत आहेत. महाराष्ट्रातील ७३१ परीक्षा केंद्रांवर बी.ए., बी.कॉम शिक्षणक्रमांच्या अंतिम लेखी परीक्षा शुक्रवार दि. ६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होत आहेत. जवळपास ६ लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.
यामध्ये बी.ए., बी.कॉम. (मराठी / इंग्रजी /उर्दू / हिंदी माध्यम), बी.ए. पोलीस प्रशासन, बी.ए. परिवहन, बी.ए. ग्राहक सेवा, एम. कॉम., बी. एस्सी. एम. एल. टी., बी. एस्सी. ऑप्टोमेटरी,बी. लिब., एम. ए. शिक्षणशास्त्र, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉटेल अॅन्ड टुरिझम मॅनेजमेंट, बी. एस्सी. हॉस्पिटॅलिटी अॅन्ड टुरिझम स्टडीज, बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अॅन्ड कॅटरिंग ऑपरेशन, बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज अॅन्ड केटरिंग सर्व्हिसेस, सहकार व्यवस्थापन पदविका, आरोग्यमित्र,रुग्णसहायक, डोटा, योगा शिक्षक, बालविकास सेविका, गांधी विचार दर्शन, बी.एस्सी. (इंडस्ट्रीयलड्रग्जसायन्स), बी.एस्सी. (इंडस्ट्रीयल सायन्स) तसेच बी. एस्सी. (ड्रग सायन्स), बी.ए. (पब्लिकसर्व्हिसेस) वएम.ए. (पब्लिकसर्व्हिसेस), सहकार व्यवस्थापन पदविका (दुग्धव्यवसाय /बँकिंग / सहकारी / कृषी व्यवसाय), (एम. कॉम., एम. एस्सी.) विषय संप्रेषण, बी. एड., एम. एड., बी. ए. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या इत्यादी पदवी /पदविका व प्रमाणपत्र या शिक्षणक्रमांच्या परीक्षा सुरु होत आहेत.
यापैकी बी.ए.,बी.कॉम. या शिक्षणक्रमांच्या परीक्षा दि. २४ मे पर्यंत सुरु राहणार आहेत. वरील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र त्यांना देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर उपलब्ध आहेत. याशिवाय http://ycmou. digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून देखील प्रवेश पत्र डाऊनलोड करून घेता येईल. तसेच ज्यांना ऑनलाइन प्रवेश पत्र डाऊनलोड करणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र संबंधित परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आलेले असून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन प्रवेश पत्र घ्यावे. ज्यांच्याकडे परीक्षा प्रवेश पत्र नसेल अशा विद्यार्थांनी आपल्या परीक्षा अर्जाची छ्यांकित प्रत, परीक्षा शुल्क भरल्याचे चलन आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रावर दाखवून हमीपत्र भरून परीक्षेस बसता येईल. विद्यार्थांना काही अडचण उदभवल्यास ते विद्यापीठाच्या ०२५३-२२३००९५ आणि २२३०१११ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अभ्यासकेंद्रावर / परीक्षा केंद्रावर संपर्क साधावा किंवा संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटूळे यांनी केले आहे.

