बेस्टच्या टप्प्यात आणि दरवाढीमध्ये सुसुत्रता आणण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या टप्प्यात आणि दरवाढीमध्ये सुसुत्रता आणण्याची मागणी

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव 
बेस्टच्या भाडयात एकीकडे वाढ होत असताना दुसरीकडे प्रवाशी मात्र कमी होत आहेत. प्रवाशी कमी होत असल्याने प्रवाशी वाढव्ण्यासाठी बेस्टने आपल्या भाडयात आणि टप्प्यात सुसुत्रता आणावी अशी मागणी बेस्ट समिती सदस्य केदार होम्बालकर यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.

सन 2015 मधे बस भाड़ेवाढ करताना बेस्टने टप्प्यामध्येही बदल केला आहे. टप्पे कमी करताना भाड्यामध्ये वाढ करण्यात आली. अश्या भाड़ेवाढीमुळे प्रवाशी बेस्टपासून दूर गेले आहेत. बेस्टला शेअर रिक्शा आणि ट्याक्सी याच्याशी मुकाबला करायचा असल्याने प्रवाश्याना सोयीचे असेल असे दर ठरवावे. बेस्टने नुसते उत्पन्न वाढवण्याकड़े न पाहता प्रवासी वाढवण्याकड़े लक्ष केंद्रित करावे. प्रवासी वाढले तरच बेस्ट वाचेल असे सांगत बेस्टने प्रवाश्यांची संख्या वाढवण्यासाठी अभ्यास करावा व् दरवाढीचा फेरविचार करावा अशी मागणी होम्बालकर यांनी केली. रवी राजा यांनी कमी अंतराचे 8 रुपयांचे तिकिट 6 रुपये करावे आणि प्रवाश्यांना फायदा करून द्यावा अशी मागणी केली.

याबाबत खुलासा करताना बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सध्या अशी दरवाढ कमी करता येणार नाही असे सांगतानाच प्रवाश्यांचा डेटा तयार केला जात आहे. हा डेटा पुढच्या दिड महिन्यात तयार होईल. डेटा तयार होताच कमी झालेल्या प्रवाश्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. (फीडर रोड) कमी अंतराच्या व् अंतर्गत रस्त्यावरील प्रवाश्यांना परवडेल असे भाड़े केले जाईल असे पाटील यांनी सांगीतले. बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी बस डेपोमधे मार्केट सेल बनवाला आहे. या सेलमधील कर्मचारी वातानुकूलीत बस भाडयावर देण्यासाठी हॉटल,  क्रुझ ओपरेटर,  इव्हेंट ऑर्गनायझर यांच्याशी संपर्क साधत आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांना बस पास देण्यासाठी बेस्टचे करमचारी शाळेत जाऊन बसपास देणार आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा त्रास कमी होईल असे पाटील यांनी सांगीतले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages